अरुण साधू - लेख सूची

यक्षप्रश्न

भारताला चीनबद्दल तिहेरी भीती वाटते. चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य, व्यापारी आक्रमकता व अणुशस्त्रसज्जता. चीनने कुरापत काढून १९६२ सारखे दुसरे युद्ध उभे केले तर? छोट्या स्वस्त मालाची चीनची उत्पादनक्षमता जबर आहे. गेल्या काही वर्षांतच अनेक त-हेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, लसूण अशा विविध मालांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. हे असेच वाढत राहिले, तर भारतीय उद्योगधंद्यांवर आणि …

लोकशाहीने घोडे मारलेले नाही?

भारताच्या लोकशाहीने काही घोडे मारलेले नाही. दिशाभूल होऊन ताळतंत्र सोडलेल्या आणि कोणत्याही सकारात्मक कामाला हात न घालता केवळ सत्तेच्या निखळ लालसेने मयूर बनलेल्या भ्रष्ट राजकीय पक्षांना ताळ्यावर आणले गेले, तरी भारतीय लोकशाही कार्यक्षम होऊ शकते. लोकशाही ही कमीत कमी दुष्ट राज्यव्यवस्था आहे, की जीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. …